Click Here...👇👇👇

शेतात जात असणाऱ्या महिलेची वाट रोखुन मारहाण. #Beating

Bhairav Diwase
1 minute read
(संग्रहित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- धिडशी येथे एका इसमाकडुन शेतात जात असणाऱ्या महिलेची वाट रोखुन मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. धिडशी येथील एक महिला चार्ली येथील आपल्या शेत शिवारात जात असतांना बंडू ताजने यांने आमच्या शेतातून जाऊ नको. जेव्हा महिलेने म्हटले कि आमचा जुना रास्ता आहे, तेव्हा ताजने यांनी महिलेची साडी ओढत मारहाण केल्याची तक्रार सदर महिलेने पोलीस स्टेशनला दिली आहे.
पोलिसांनी भादंवि कलम ३२३ व ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. ताजने हा धिडशी येथील तंटामुक्ती अध्यक्ष पद ५ वर्ष भूषवले होते. अश्या व्यक्तीकडून महिलेला मारहाण केल्याबद्दल गावात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.