Top News

शिक्षकांच्या सन्मानासाठी व न्याय हक्कासाठी भाजप शिक्षक आघाडीचे आंदोलन. #Chandrapur


चंद्रपूर:- भाजप शिक्षक आघाडी शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कासाठी लढा देत राहणार आहे ."शिक्षकों के सन्मान में भाजपा मैदान मे" राज्यव्यापी धरणे आंदोलन दिनांक ८सप्टेंबर २०२१बुधवार ला जिल्हा परिषद चंद्रपूर समोर करण्यात आले. शिक्षकांच्या समस्या कडे महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष करित आहे. हे सरकार शिक्षकांचे शोषण करित आहे. शिक्षकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी भाजप शिक्षक आघाडी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शिक्षकांच्या न्यायासाठी हक्कासाठी नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलन करीत राहणार आहे. जोपर्यंत शिक्षकांना न्याय मिळत नाही तोपर्य भाजप शिक्षक आघाडी चा लढा चालूच राहणार आहे. असे भाजप शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक गुरूदास कामडी यांनी सांगितले. भाजप शिक्षक आघाडी जिल्हा चंद्रपूर "शिक्षक व के सन्मान में भाजपा मैदान मे" राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप शिक्षक आघाडी कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण त्या तारखा घोषित करा. शिक्षकांचे वेतन एक तारखेला झालेच पाहिजे! शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे! शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करा. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. भाजप शिक्षक आघाडी प्रदेश कार्यकारणी सदस्य रंजीव श्रीरामवार यांनी शिक्षकांच्या समस्या कडे लक्ष वेधून महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. हे महाविकास आघाडी सरकार शिक्षक व शिक्षण विरोधी असून शिक्षकावर अन्याय करणारे आहे .म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे. असे सांगितले "शिक्षको के सन्मान में भाजपा मैदान में" राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे नेतृत्व भाजप शिक्षक आघाडी चे प्रदेश कार्यकारणी सदस्य रंजीव श्रीरामवार, जिल्हा संयोजक गुरुदास कामडी , महानगर जिल्हा संयोजक प्रा. अरुण रहांगडाले यांनी केले.
भाजप भाजप शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक गुरुदास कामडी, महानगर जिल्हा संयोजक प्रा. अरुण राहंगडाले, प्रदेश कार्यकारणी सदस्य रंजीव श्रीरामवार , जिल्हा सहसंयोजक श्रीकांत कुमरे ,राकेश बुटले, प्रा. पुंजाराम लोडे, प्रफुल्ल राजपुरोहित, मंगला बंडेवारी प्रा. स्नेहल बांगडे ,भाजप भटके-विमुक्त आघाडी महानगर अध्यक्ष दिवाकर पुद्दटवार यांच्या शिष्टमंडळाने मा.जिल्हा शिक्षण शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर (माध्यमिक) उल्हास नरड यांना; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. वरिष्ठ व निवड श्रेणीचा प्रशिक्षणाच्या तात्काळ घोषित करा. १नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बंद कलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तात्काळ सुरू करा. १ तारखेला वेतन मिळणे बाबत व वेतनात विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्ती रक्कम तात्काळ देय करण्याबाबत. परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक (शिक्षण सेवक), परिविक्षाधीन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे वाढ करण्यात यावी. शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०,२०,३० आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करा. घोषित ,अघोषित व मूल्यांकनात पात्र तुकड्यांना शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू करावी. रात्र शाळेतील कर्मचाऱ्यांना १७ मे २०१७च्या शासन निर्णयानुसार पूर्णकालीन कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ मिळावेत . सी.बी.एस.ई. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र शाळा न्यायाधिकरणाची स्थापना करावी . इत्यादी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या न्याय मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास भाजप शिक्षक आघाडी राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला.
    "शिक्षको के सन्मान में भाजपा मैदान में" या राज्यव्यापी आंदोलनात जिल्हा सहसंयोजक अरविंद राऊत, गणेश तर्वेकर, विलास गुडधे, अनंत डेहनकर, मनोज पदमवार ,सचिन जागीरदार, प्रवीण पिंपळकर, सुनील पाचखेडे ,उर्वशी उमाटे,छाया धकाते, किशोर कहारे , बी.व्ही.पगाडे, धनंजय दुधे, विलास दुर्लावार इत्यादी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप शिक्षक आघाडी महानगर संयोजक प्रा. अरुण रहांगडाले यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानले व आंदोलनाची सांगता केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने