जाहिरात... Advertisement... विज्ञापन

जामखुर्द येथे गोठ्याची भिंत कोसळून तीन शेळ्यांचा मृत्यू. #Death #Pombhurna


पाच शेळ्या गंभीर तर बारा शेळ्या किरकोळ जखमी.
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्ण:- मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पोंभूर्णा तालुक्यातील जामखुर्द येथे गोठ्याची भिंत कोसळल्याने तीन शेळ्यांचा मृत्यु झाला असून पाच शेळ्या गंभीर जखमी झाले आहेत.तर बारा शेळ्या किरकोळ जखमी झाले आहेत. #Death #Pombhurna
पोंभूर्ण्या तालुक्यात दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू होता.तान्हा पोळ्याच्या दिवशी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे पोंभूर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील पुरुषोत्तम मडावी यांच्या गोठ्याची भिंत कोसळून किशोर भिमाजी सोमनकार यांच्या मालकीच्या २० नग शेळ्यांपैकी ३ शेळ्याचा मृत्यू झाला असून ५ शेळ्या गंभीर जखमी आहेत तर १२ शेळ्या किरकोळ जखमी झाले आहे.
यामुळे सोमनकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
----------------------------------------
पोंभूर्णा तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी हानी झाली आहे. देवाडा खुर्द गावातील वसंत भुरसे व बरू गव्हारे यांच्या घरांची भिंत कोसळली आहे. यात घरातील सामानाचे फार मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतपिकाला सुद्धा पावसाचा फार मोठा फटका बसला आहे. सोयाबिन,पराठी, मिरची पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतपिकाचे नुकसान झाल्याने हवालदिल झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत