जिल्हा प्रमुख पदी प्रा. अतुल कामडी व जिल्हा संयोजक पदी प्रविण गिरडकर. #Bramhapuri

ब्रम्हपुरी:- भारतीय विद्यार्थी परिषद जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. अभाविप विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. दर वर्ष अभाविप चा विविध ठिकाणी अधिवेशन आणि अभ्यास वर्ग आयोजित केले जातात. यावर्षी विदर्भ प्रांत अभ्यास वर्ग 4 व 5 सप्टेंबर ला वाशीम येथे संपन्न झाला. या अभ्यास वर्गात विदर्भ प्रांतातील जिल्हातील कार्यकर्ते या दोन दिवसीय अभ्यास वर्गात आले होते.
विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रा. योगेश येणारकर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रम्हपुरी जिल्हा प्रमुख म्हणून प्रा. अतुल कामडी व ब्रम्हपुरी जिल्हा संयोजक म्हणून प्रविण गिरडकर यांची घोषणा करण्यात आली. या अभ्यास वर्गात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, अखिल भारतीय जनजाती कार्य प्रमुख गोविंद नायक, पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रा. योगेश येणारकर, विदर्भ प्रांत मंत्री अखिलेश भारतीय, विदर्भ प्रांत संघटनमंत्री विक्रमजीत कलाने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत