ट्रॅक्टर मालकाच्या निष्काळजीपणामुळे नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. #Death

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
मुल:- मुल तालुक्यातील पिंपरी दिक्षित येथील ट्रॅक्टर मालकाच्या निष्काळजीपणामुळे नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ३ वाजताच्या सुमारास घडली. मृतक मुलीचे नाव वैष्णवी मनोज ढोंगे रा. पिंपरी दिक्षित असे आहे.
सविस्तर वृत्त असे की, पिंपरी दिक्षित गावातील रस्तावर MH 34 BF 1614 ट्रक्टर उभी होती. त्या ट्रक्टरवर व बाजूला गावातील चिमुकली मुलं, मुली खेळत असताना. ट्रक्टरचा हॅन्ड ब्रेक लावून नसल्याने व रिव्हर्स घेर अचानक पडल्याने ट्रक्टर मागे जायला लागल्याने चिमुकली मुलं मुली खाली उतरले. मात्र वैष्णवी मनोज ढोंगे हि खाली उतरताना चाकात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
ट्रक्टर मालकाच्या निष्काळजी पणामुळे सदर घटना घडली असून एका चिमुकलीचा नाहक बळी गेला आहे.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.