(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
विरुर स्टे.:- राजुरा तालुक्यातील विरूर स्टे. परिसरात येणारे सुब्बई ग्राम पंचायत येथे ग्राम पंचायतला भर दिवसात 12 च्या दरम्यान कुलूप दिसून येत आहे. यामुळे लोकांना नाहीसा त्रास सहन करावा लागत आहे. कोणतेही कागतपत्रसाठी वारंवार चक्कर मारावे लागतात आणि सुब्बई येथील ग्रा. प. बंद असते. थोमापुर हे गाव सुब्बई या ग्राम पंचायत मध्ये येत असून या थोमापूर् गावाकडे ग्राम. प. का लक्ष देत नाही हा विषय घेउन सोमवारला थोमपुरचे काही युवा कार्यकर्ता गेले असता ग्राम पंचायत बंद मिळाल्याने नाराज होऊन परत आले. सुब्बई ग्रामपंचायतीकडून केल्या जाणारा भेदभाव कितपत योग्य आहे त्यामुळे थोमापुर या गावची सुब्बई ग्रामपंचायतीकडे धाव घेतांना दिसून येत आहे. त्यामध्ये गावकरांची मागणी मध्ये
1) सदर एक वर्षापासून थोमापुर या गावामध्ये व्यवस्थित लाईटची सुविधा नाही.
2) थोमापुर गावामध्ये काही ठिकाणी नाले तर बांधल्या आहेत परंतु यांची सफाई वर्षापासून न झाल्यामुळे ते पूर्ण नाल्या बुजून गेले आहेत आणि काही ठिकाणी नाल्यात बांधलेल्या नाहीत.
3)सुब्बई ग्रामपंचायत मधील थोमापुर या गावामध्ये एकही पक्के रस्ते नाही.
4) सुब्बई ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या गावांची नावे
a) सुब्बई
b) थोमापुर
c) बापूनगर
d) इंदिरानगर
एवढे गाव या ग्रामपंचायत मध्ये असून सुब्बई या गावांमध्ये सगळे पक्के रस्ते बनवण्यात आले आहे परंतु तो थोमापुर या गावांमध्ये भेदभाव का बरं ?
5) थोमापुर या गावातील सार्वजनिक बोरिंग खराब झाल्याने सहा महिन्यापासून दुरुस्ती नाही.
6) दरवर्षी गावांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती आणि फवारणी केली जाते परंतु यावर्षी सुब्बई ग्रामपंचायत यांनी काहीही दखल घेतली नाही.
7) सुब्बई ग्रामपंचायत आठवड्यातून आपल्या मर्जीने ग्रामपंचायतीतील कर्मचारी येतात आणि जातात त्यांचा काही ठराविक वेळच नाही.
8) थोमापुर या गावांमधील सार्वजनिक विहिर हे खुल्या असल्यामुळे त्या विहिरीमध्ये कधी मांजर तर कधी साप हे विहिरीमध्ये पडतात आणि पाण्याची सोय तर ग्रामपंचायतीकडे मागूनही होत नाही या विषयावर अनेकदा ग्रामपंचायतीकडे विहिरीला वरून आवरण द्या अशी मागणी करण्यात आली परंतु याची कधीच कुणी दखल घेतली नाही आणि कधी ब्लिचिंग पावडर विहिरीमध्ये टाकल्या जात नाही.
9) सुब्बई ग्रामपंचायत येथील ऑपरेटर हा नागरिकांना वेळेवर काम करून देत नाही आणि सगळ्यांकडून वेगवेगळे फीस त्याच्या मनाप्रमाणे घेतो.
आणि याच्यावर कोणाचे बंधन नाही.
10) थोमापुर गावातील नागरिकांची काही गरजा किंवा मागणी ग्रामपंचायतीकडून कधी स्वीकारला जात नाही असा भेदभाव का? असा प्रश्न सुरेश बनोद, श्रीनिवास अजमेरा, रीतिक राठोड, देविदास भुक्या, ओमशी घुग्लोत, सचिन घुग्लोट, दिलीप घूग्लोत, दिलीप घुग्लोठ
अरुण बानोद, नितीन घुग्लोत्, कपिल सोबतच थोमापुर या गावातील रहिवासी यांनी विचारला आहे.#Grampanchayat