जाहिरात... Advertisement... विज्ञापन

मारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आत्तापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा. #Mulमुल:- मारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आतापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा आज दिनांक 21/9/ 2021रोजी मंगळवार ला संपन्न झाली साधरण 400ते 500ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही रंगतदार ग्रामसभा करण्यात आली ग्रामसभेमध्ये 1) रोजगार हमी योजना ,घर टॅक्स वसुली, महिला बाल कल्याण च्या विविध योजना, समाज कल्याण च्या विविध योजना, व तसेच महत्वाची म्हणजे जुन्या ग्रामपंचायत कमेटीने कुठलाही प्रकारची ग्रामसभा न घेता धर्मदाय आयुक्त याच्याकडे दिशाभूल करणारा ग्रामसभेचा 20 लोकांच्या खोट्या स्वाक्षरीचा ठराव घेऊन धर्मादाय आयुक्तांना पाठवण्यात आला व गावातील लोकांना माहिती न देता स्वतःच्या स्वार्थासाठी  ट्रस्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा दिशाभूल करणारा कमेटी ची उकल ग्रामसभेत मध्ये करण्यात आली.


  स्वताचा मनमानी श्री सोमनाथ देवस्थानाची घटना बदलवून ट्रस्ट बनविन्यात आली व तसेच गावातील लोकांची भावना दुःखवील्या त्या बद्दल गावातील लोकांना रोष होता तो रोष नवनिर्वाचित कमेटीने  ग्रामस्थांनाच्या सहमतीने व कोणताही जाती धर्माचा भेदभाव न करता सर्वधर्म समभाव याप्रमाणे  प्रतेक समाजातील लोकांना  सोमनाथ देवस्थान कमेटी मधे सदस्य बनविण्याचा सर्वानुमते ठरविण्यात  आला तसेच तंटामुक्ती गाव समिती गठित करण्यात आली व ग्रामसभा संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने शांततेत पार पडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत