चिमूर तालुका (NSUL) अध्यक्षपदी प्रज्वल पिसे यांची नियुक्ती. #Appointment

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी कांग्रेस (NSUI) चे संघटन वाढविण्यासाठी चिमूर तालुकाध्यक्ष म्हणून सतिश वारजुकर यांचे सोशल मीडीया चे काम सांभाळणारे प्रज्वलभाऊ पिसे यांची निवड करण्यात आली. त्यांना ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ. सतिश वारजूकर यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी चिमूर महिला तालुका कांग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सविताताई चौधरी, युवक काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख चिमुर विधानसभा क्षेत्र शुभम पारखी, सरपंच कुडलीक मेश्राम, उपसरपंच तुळशीदासजी शिवरकर यावेळी उपस्थित होते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.