नदीत पात्रात मिळाल्या चपला आणि काठी.
नदीमध्ये पोलिसांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील व मुल पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज येथील शैलेश अशोक निमसरकार हा काल दुपारी तीन वाजता पासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. #Pombhurna #mulpolicestation
काल तो ४ वाजताच्या सुमारास शेजारील जुनगाव येथे दिसला होता. तेव्हा त्याच्या हातात काठी होती. त्यानंतर त्यांची काठी व चपला वैनगंगा नदीच्या पात्रात आढळून आल्याने त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला कि त्यांने आत्महत्या तर केली नसावी अशी शंका उपस्थित केली जात असून बेंबाळ पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वैनगंगा नदीत शोध मोहीम सुरू असल्याची माहिती आहे. #Adharnewsnetwork
बेपत्ता असलेल्या तरुणाची शोधमोहीम सुरू
नदीत इलेक्ट्रॉनिक बोट दाखल
पं.स. सभापती अलका आत्राम यांनी घेतली गंभीर दखल
काल दुपारपासून बेपत्ता असलेला तरुण शैलेश अशोक निमसरकार राहणार देवाडा बुद्रुक हा 26 वर्षीय तरुण नदीत बुडून मरण पावला असल्याची शंका गृहीत धरून, इलेक्ट्रॉनिक बोट च्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मारशेटीवार यांनी पंचायत समिती सभापती अलका आत्राम यांना दूरध्वनी करून, बेपत्ता असलेल्या तरुणाचा शोध घेण्याकरिता इलेक्ट्रॉनिक नावेची व्यवस्था करावी अशी मागणी केली. सभापती अलका आत्राम यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपर्क केला, व तात्काळ इलेक्ट्रॉनिक नावेची व्यवस्था करून शोधमोहीम सुरू झाली आहे. वृत्त लिहिस्तोवर संबंधित तरुणाचा थांगपत्ता लागलेला नव्हता.