विहिरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या. #Suicide

Bhairav Diwase

गोंडपिपरी तालुक्यातील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील व्यक्तीची विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मृतकाचे नाव सुधाकर मोंडी मित्थावार असे असून तो व्यक्ती भं. तळोधी येथील रहिवासी आहे. राजेश्वर बिरा येग्गेवार हे आपल्या शेतात कामाकरीता सकाळी गेले असता त्यांना आपल्या विहिरीमध्ये कुणी तरी मरण पावले असल्याचे कळले. #Suicide #Adharnewsnetwork
त्यांनी गावातील पोलिस पाटील यांना सांगून गोंडपिपरी पोलिस स्टेशन येथे कळविण्यात आले. आत्महत्या का केली अद्याप कळू शकले नाही. गोंडपिपरी तालुक्याचे पोलिस अधीक्षक जीवन राजगुरू साहेब आणि पोलिस अधिकारी शामराव पुलगमकार साहेब यांनी चौकशी केली असून याचा अधिक तपास सुरू आहे.