(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली.यामध्ये अध्यक्षपदी मधुकर सातरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. #President #DewadaKhurd
सरपंच विलास मोगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत उपस्थित १९८ ग्रामस्थांनी अध्यक्ष व सदस्यांची बिनविरोध निवड केली. #DisputeResolutionCommittee
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सदस्यांचे सरपंचांनी सत्कार करून तंटामुक्त गाव करण्यासाठी समीतीने मोलाचे सहकार्य करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केले.
समीतीच्या सदस्यपदी सरपंच विलास मोगरकर, उपसरपंच कांता निमसरकार, पत्रकार विजय वासेकर, व्यापारी बाबाजी गव्हारे, ग्रामविकास अधिकारी डि.एम.शिंदे, बिट अंमलदार सुरेश बोरकुटे, मुख्याध्यापक दिलीप इटनकर, हमिदा पठाण, बारूबाई टेकाम, सुरेखा बुरांडे, भोयर यांची निवड करण्यात आली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत