🙏


🙏✍️

नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पूर्व परीक्षेत राजुरा तालुक्यातील सिंधी येथील दोन विद्यार्थी पात्र. #Student(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
विरुर स्टे.:- नवोदय विद्यालय प्रवेश पुर्व परीक्षा
दिनांक 11ऑगष्ट 2021 ला पार पडली होती. कोरोना च्या काळात सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळे अभ्यासाचा खोळंबा झाला आहे तसेच एकदा परिक्षेचे वेळापत्रकही बदलण्यात आले होते.
अशा कठीण परिस्थितीत झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश पुर्व परीक्षेत येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंधी येथील विद्यार्थी प्रज्योत विनोद दरेकर आणि शिव रामभाऊ ढुमणे हे उत्तीर्ण झाले.
 तसेच  तालुक्यातील तेजस्वी रामरतन चापले,शोर्या मनोज लांडे, हर्षा भिमराव उपरे, आरोही टिकले यांनी नवोदय विद्यालयात प्रवेश पुर्व परीक्षा उत्तीर्ण केली आहे.. विशेष म्हणजे शिव रामभाऊ ढुमणे हा सैनिक विद्यालय चद्रंपुर येथे सुध्दा उत्तीर्ण झाला आहे.  सर्व स्तरावरुन  त्यांचे अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे शिक्षक व आईवडील यांना दिले आहे.यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.#Student

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत