जाहिरात... Advertisement... विज्ञापन

वाघाच्या हल्लयात शेतकरी ठार. #Tigerattack #Saoli #death


सावली तालुक्यातील घटना.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- शेतात काम करीत असताना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना नुकतीच घडली. शालीकराम मनिराम चापले वय ३५ असे मृत शेतकऱ्याचे नाव असुन तो गेवरा खुर्द येथील रहिवासी होता. #Tigerattack #Saoli #death
मिळालेल्या माहितीनुसार धानपीकाचे रोवणे निंदणाच्या कामाला सुरुवात झाली असल्यामुळे अनेक शेतकरी शेतात काम करीत आहेत. सावली तालुक्यातील अनेक ग्रामीण भाग हा जंगल व्याप्त असुन गावालगत शेतीलगत जंगल आहेत अश्या परिस्थितीत शेतात काम करीत असतांना या भागात नेहमीच वन्यजीवाचा हौदोस दिसुन येत आहे. अश्याच घटनेत मृतक हा शेतात काम करण्यासाठी गेला असता शेतालगत असलेल्या जंगल परिसरात दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला शेतकऱ्यावर हल्ला करून जागीच ठार करत जंगल परिसरापर्यंत ओढत नेले. घटनेची माहीती मिळताच काही लोकांनी याबाबत माहिती वन विभागाला दिली. वन अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करत मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबियांना तात्काळ 25 हजाराची मदत दिली. कुटुंबातील कमावता कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबात व गावात शोककळा पसरली आहे.
वाघाच्या हल्लाने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या परिसरात शेती कामासाठी बाहेर निघणे कठीण होऊन बसले आहे त्यामुळे अशा नरभक्षी वाघाला त्वरीत जेरबंद करण्यात यावे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत