Top News

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार. #Tigerattack


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील खांडला येथील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना दिनांक 19 सप्टेंबर 2021 रविवार रोज दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मृतकाचे नाव अनिल सोनुले (वय ३६ ) असे आहे.
खांडला गाव परिसरातील पळसगाव ( पिपर्डा) बफर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात शेतकरी अनिल सोनुले स्वतःचे जनावरे चराईला घेऊन गेले असता जवळच दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले. #Tigerattack
सदर घटनेची माहीती मिळताच पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले व मौका पंचनामा केला. वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने