Click Here...👇👇👇

चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच तीन विद्यार्थी UPSC परीक्षेत उत्तीर्ण. #upsc #pass #Chandrapur

Bhairav Diwase
1 minute read

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल शुकवारी जाहीर झाला. यात युपीएससी सिव्हील सेवा परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून पहिल्यांदाच तीन विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहे.

🚨कोरोना काळात मृत्युशी झुंज देत वरोराचा आदित्य जिवने UPSC परीक्षा उत्तीर्ण.

🚨चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच तीन विद्यार्थी UPSC परीक्षेत उत्तीर्ण.

देवव्रत वसंत मेश्राम हा 713 रँकने परीक्षा उत्तीर्ण...

जिल्ह्यातील मागास समजल्या जाणाऱ्या सावली येथील देवव्रत वसंत मेश्राम याने देशातून 713 वी रँक पटकावत सावलीकरांच्या कोतुकात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाने सर्वसामान्य कुटुंबातील व प्राथमिक शाळेतील विध्यार्थीही अथक परीश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्नाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येऊ शकते हे दाखवून दिले.
आदित्य जिवने हा 399 रँकने परीक्षा उत्तीर्ण...

वरोरा येथील आदित्यला कोरोना महामारीत कोविडची लागण झाल्यानंतर, सिटी स्कॅन स्कोअर 18 असतांना रूग्णालयात मृत्युशी झुंज देत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा 399 व्या रँकने उत्तीर्ण होण्याची किमया वरोरा येथील आदित्य जिवने या युवकाने साधली आहे.आज आदित्य आयएएस होताच त्याचेवर सर्वस्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.
अंशूमन यादव हा 242 रँकने परीक्षा उत्तीर्ण...

चंद्रपूर येथील जटपूरा गेट येथे वास्तव्य असलेला व आता दिल्ली येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत अंशूमन यादव हा 242 रँकने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. अंशुमनचे वडील वेकोली मध्ये कार्यरत आहे. त्याने यशाचे श्रेय आई, वडील व कुटूंबियांना दिले.