Top News

दोन नक्षलवाद्यांना अटक. #Arrested


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- तब्बल दोन लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले.

मुडा मासा झोही आणि मैनु दोरपेटी अशी या नक्षलवाद्यांची नावे आहेत. हे नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे सुरजागड उत्खननाच्या विरोधात २६ ऑक्टोबर रोजी रॅली काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झाले होते.

अटक करण्यात आलेला जहाल नक्षली मुडा मासा झोही हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल असलेल्या मौजा- गोरगुट्टा ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील रहिवासी असून, त्याचेवर २७ फेब्रुवारी २०१९ रोजी मौजा झारेवाडा, १५ मार्च २०२० रोजी मौजा बोडमेटा आणि ४ मार्च २०२१ रोजी मौजा कोपर्शी (मुरुमभूशी) जंगल परिसरात झालेल्या चकमकीचे ३ गुन्हे दाखल आहेत. तो गटटा दलममध्ये भरती होवुन सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या ऍक्शन टीमचा सदस्य होता. शासनाकडून त्याचेवर दोन लाख रुपयाचे बक्षीस जाहिर करण्यात आले होते. जनमिलीशिया सदस्य मैनु दोरपेटी रा. बोडमेटा ता. एटापल्ली येथिल रहिवासी असून, त्याचा १८ सप्टेंबर २०२१ रोजी सोमाजी चैतु सडमेक रा. एटापल्ली या सामान्य नागरिकाची हेडरी ते सुरजागड रोडवर केलेल्या हत्येच्या गुन्हयामध्ये तसेच ११ मे २०२१ रोजी झालेल्या गट्टा (जां.) पोस्ट अटॅक अशा २ गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. शासनाकडून त्यांचेवर दोन लाख रुपयाचे बक्षीस जाहिर करण्यात आले होते. तो नक्षल्यांच्या हिंसक कृत्यांमध्ये नेहमी सामिल होवून घातपाताच्या घटना घडवून आणण्यास नक्षल्यांना मदत करीत होता.जहाल नक्षली मुडा मासा झोही व मैनु दोरपेटी या दोन्ही नक्षलींच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्यांचेवर एकूण ४ लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांचे नेतृत्वात विशेष अभियान पथकातील जवानांनी पार पाडली असून, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदर दोन्ही नक्षलवाद्यांना अटक करण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता परिश्रम घेतलेल्या जवानांचे कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने