भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम यांची केम तुकूम पीडित पालकांना भेट. #Ballarpur

Bhairav Diwase

बल्लारपुर:- बल्लारपूर तालुक्यातील केम तुकूम येथे जि प शाळेत शिकणाऱ्या 7 मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकांला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची शिष्ट मंडळाने भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
आमदारांनी तात्काळ आय जी साहेब तसेच एस पी सरांना लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी सांगितलं. तसेच उत्तम वकील कसा देता येईल यासाठी सुद्धा चर्चा करण्यात आली. त्या गावात जाऊन मुलींच्या पालकांची भेट घेऊन चर्चा करून कार्यवाही करण्यासाठी तसेच यापुढे असे प्रकार होऊ नये, मुलींनी दाखवलेला धाडस सुद्धा की त्यांनी कित्येक वर्षा पासून सुरु असलेल्या घाण विकृतीला समोर आणलं अशा व्यक्तीला कठोर हीच शिक्षा असू शकते, म्हणजे दुसरे विकृत तयार होणार नाही.
यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, जिल्हा परिषद सदस्या वैशाली बुद्धलवार, तसेच शिष्टमंडळ उपस्थित होते.