जाहिरात... Advertisement... विज्ञापन

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे, या ईश्वरीय कार्यासाठी सदैव तत्पर राहू:- आमदार सुधीर मुनगंटीवार #Ballarpur


बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाच्या समस्येवर बैठक संपन्न.

बल्लारपूर:- महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर रामबाग विश्रामगृह येथे बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाच्या विविध समस्येवर बैठक घेण्यात आली व अनेक विषयावर चर्चा करून त्या समस्येचे समाधान करण्यात आले.

या बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्तीनाथ राठोड, तालुका वैद्यकीय अधीक्षक गजानन मेश्राम यांच्यासह यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडीचे महामंत्री अजय दुबे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, बल्लारपूर तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आदित्य शिंगाडे, ट्रान्सपोर्ट आघाडीचे तालुकाध्यक्ष गुलशन शर्मा, मनीष रामिल्ला, श्रीकांत उपाध्याय यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत