Top News

जिल्हा परिषद चंद्रपूर सुशिक्षित बेरोजगार अभियंता कोट्याततील काम वाटपात होतोय घोळ.

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी केली मनसेकडे तक्रार.

तक्रारीची दखल घेत चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी जिल्हा परिषदेत धडकले.
चंद्रपूर:- जिल्ह्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना त्यांच्या कोट्यातील काम वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची काम वाटप प्रक्रिया संपूर्ण भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या हाताला काम मिळावे व अभियंते बेरोजगार राहू नये म्हणून सरकारने जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग सारख्या कार्यालयातर्फे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे मिळावी म्हणून सरकारने शासन निर्णय केला महाराष्ट्र सरकार शासन निर्णय शुद्धीपत्रक क्रमांक सी ए टी शून्य एक ऑब्लिक पब्लिक 2015 प्रक्र 20 पब्लिक विमा दोन मंत्रालय मुंबई प्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील अभियंत्यांना दहा लाखापेक्षा कमी कामाचे वाटप जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना माहिती देऊन बैठक घेऊन करायचे असते.
सदर काम वाटप प्रक्रिया पारदर्शक निष्पक्ष होणे गरजेचे असते त्याकरिता जिल्हा परिषदेतर्फे काम वाटप समिती नेमलेली असते काम वाटप समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव कार्यकारी अभियंता बांधकाम असतात देवाण-घेवाण टक्केवारी मुळे संपूर्ण काम वाटप प्रक्रिया स्पष्ट झाली आहे म्हणून मोठ्या प्रमाणात गोड होत आहे. होतकरू सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर अन्याय होत आहे.
शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामवाटप बैठकीची माहिती दिली जात नाही. कार्यालयातर्फे कोणतेही अधिकृत कार्यालयीन पत्र नोटीस ईमेल मोबाईल टेक्स्ट मेसेज जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दिला जात नाही. वाटप समिती व मर्जीतील सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार गोपनीय बैठक घेऊन टक्केवारी ठरवून कामे वाटप केली जाते काम वाटप समितीमध्ये कोण कोण सदस्य आहे याची निवड कोण करते कशाप्रकारे कामे वाटप केली जाते याची माहिती अद्याप सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दिली गेलेली नाही.
 एक आज अभियंत्याच्या नावाने दोन दोन तीन तीन कामे दिली जाते. शासन निर्णयाप्रमाणे 33 टक्के सुशिक्षित बेरोजगारांना 36 टक्के मजूर सहकारी संस्थेला व उर्वरित 34 टक्के ओपन गटाकरिता अशा प्रकारे कामे वाटप होणे गरजेचे असते वाटप समिती तसे न करता जास्तीत जास्त कामे मजूर सहकारी संस्थेला दिली जाते ठरवून दिलेल्या प्रमाणात कामे वाटप केली जात नाही. खडीकरण डांबरीकरण सिमेंटीकरण आधीच सर्व दहा लाखापर्यंत ची कामे मजूर सहकारी संस्थेला दिले जाते.
     
    सुशिक्षित अभियंत्यांना जास्तीत जास्त पाच ला खालील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ची कामे दिली जाते जिल्हा परिषद तर्फे विविध निधी अंतर्गत वेगवेगळ्या हेड मध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामी दिली जाते व काम पूर्ण झाल्यावर त्या हेड मध्ये निधीच उपलब्ध नसल्याचे आढळून येते कंत्राटदाराची मिले अडकून पडतात ऑनलाईन प्रकाशित झालेल्या टेंडर मधील फक्त सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मिळालेली कामे तांत्रिक अडचणी दाखवत रद्द केली जातात कोणती तांत्रिक अडचण याची माहिती सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दिली जात नाही आधी सर्व होणाऱ्या अन्यायाची भ्रष्टाचाराची तक्रार सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी मनसे नगरसेवक सचिन भोईर यांच्याकडे केली.
   
      तक्रारीची दखल घेत चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी जिल्हा परिषदेत धडकले होणाऱ्या भोंगळ कारभाराची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली शेट्टी यांच्याकडे तक्रार केली व संबंधित कार्यकारी अभियंता यांचा चांगलाच समाचार मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतला. संपूर्ण भ्रष्ट काम वाटपाची प्रक्रिया सुधारा अन्यथा संबंधित एकाही अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही असा इशारा मनसेचे नगरसेवक सचिन भोईर यांनी दिला.
   
     यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष मायाताई मेश्राम, शहर उपाध्यक्ष अक्षय चौधरी, मनवा से शहराध्यक्ष असलम शेख, मनसे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम शिंदे बल्लारपूर शहराध्यक्ष श्रेयश ठाकूर जाफर बॅग विनय थेटे मंगेश चौधरी तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने