जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पोलिसांनी जप्त केला नक्षल्यांचा मोठा स्फोटक साठा. #Police


गोंदिया:- गोंदिया जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने नक्षलग्रस्त असलेल्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील पोलिस स्टेशन केशोरीअंतर्गत येत असलेल्या भरनोली आउट पोस्टमधील आंबेझरी ते नागलडोह मार्गावरील जंगलात नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या स्फोटक साहित्याचा शोध लावून साठा हस्तगत केला.
गडचिरोली आणि गोंदियाचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम जिल्हा पोलिसांनी राबवली.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सी ६० जवानांचे पथक आणि पोलिसांची एक चमू सर्चिंग मोहिमेवर असताना त्यांना नागनडोह मार्गावरील जंगलालगतच्या मार्गावर स्फोटके लपवून ठेवल्याचा संशय आल्याने शोध मोहीम सुरू केली. यावेळी अंदाजे ६७ डेटोनेटर, २३ जलिटीन रॉड, वायरसह अन्य विस्पोटक साहित्य घटनास्थळावरून हस्तगत केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत