जाहिरात... Advertisement... विज्ञापन

जेष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी संघटन बळकट करावे:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे. #Bramhapuri

भारतीय जनता युवा मोर्चा मुडझा येथे शाखा फलक अनावरण व कार्यकर्ता संघटनात्मक बैठक संपन्न.
ब्रम्हपुरी:- राज्याचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांची युवा संकल्प यात्रा सुरू आहे. या अंतर्गत भा.ज.यु.मो मुडझा येथील युवा वॉरीयर शाखा फलक अनावरण व कार्यकर्ता बैठक मा.आशीषभाऊ देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी आशिषभाऊ देवतळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी जेष्ठ नेते झरकर सर, माजी सरपंच टोमतीजी, पं. स सदस्य नीलकंठ मानापुरे जी,युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी झरकर सर , माजी सरपंच टोमतीजी, पं स सदस्य नीलकंठ पा मानापुरे, युवा नेते ज्ञानेश्वरजी दिवठे, सरपंच नैताम, अरुण झंझाड, बोबाटेजी, उपसरपंच कोटगले, जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, शहर अध्यक्ष कामगार आघाडी नेते मनीष रामील्ला, बंडू कोटगले, मोतीराम मेश्राम, रेखा बोभाटे, रूपाली तिवाडे, स्वाती राऊत, मनीष मानापुरे, युवा मोर्चा शाखा अध्यक्ष सुशील झंजाळ मनीष मानापुरे, युवा मोर्चा शाखा अध्यक्ष सुशील झंजाड, महामंत्री मोतीराम कटकाम , महामंत्री नितीन कटकाम, उपाध्यक्ष मिथुन टोमटी, सचिव अमोल इटनकर, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत