Top News

समाजातील शेवटच्या घटकाच्या सशक्तीकरणासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कटिबद्ध रहावे:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे. #BJYM


ब्रम्हपुरी तालुक्यातील रामपुरी येथील भारतीय जनता युवा मोर्चा शाखा फलक अनावरण व कार्यकर्ता बैठक संपन्न.
ब्रम्हपुरी:- राज्याचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांची युवा संकल्प यात्रा सुरू आहे. या अंतर्गत भा.ज.यु.मो रामपुरी युवा वॉरीयर शाखेचे फलक अनावरण व कार्यकर्ता बैठक मा.आशीषभाऊ देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी आशिषभाऊ देवतळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी जेष्ठ नेते अरुण शेंडे सर, युवा नेते यशवंतभाऊ आंबोरकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी माजी जि.प सदस्य काशीनाथ पा. थेरकर, जेष्ठ नेते रामकृष्ण पाटील बोरकर, जिल्हा महामंत्री महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष वंदनाताई शेंडे, सरपंच रेवती उमेश ठाकूर, उपसरपंच सचिन मेश्राम, जेष्ठ कार्यकर्ते भीमा माहुरे, मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, शहर अध्यक्ष कामगार आघाडी नेते मनीष रामील्ला, मारोती थेरकर, भा.ज.यु.मो शाखा अध्यक्ष होमदेव पत्रे, कृष्णा तुपट यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने