Top News

युवा वॉरियर्सने केंद्र शासनाच्या लोकोपयोगी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे #BJYM.

बेटाळा येथे भारतीय जनता पार्टीचे शक्तिप्रदर्शन.

भाजयुमो युवा वारियर्स शाखा अनावरण व भाजपा, युवा मोर्चा व महिला आघाडीचा गाव मेळावा संपन्न.
ब्रम्हपुरी:- राज्याचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांची युवा संकल्प यात्रा सुरू आहे. या अंतर्गत भा.ज.यु.मो बेटाळा येथे युवा वॉरीयर शाखेचे फलक अनावरण व भाजपा, युवा मोर्चा व महिला आघाडी चा गाव मेळावा मा.आशीषभाऊ देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी आशिषभाऊ देवतळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार,भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर, भा.ज.यु.मो जिल्हा कार्य. सदस्य बेटाळा क्षेत्राचे युवा नेते लीलारामजी राऊत यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

भाजपच्या वतीने या प्रसंगी शक्ती प्रदर्शन करण्यात आले. शेकडोच्या संख्येने भाजपा, युवा मोर्चा व महिला आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी माजी पं. स सदस्य नामदेवराव राऊत, तुळशीदास राऊत, भास्कर ढोंगे, सर्व ग्राम.पं सदस्य, मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, शहर अध्यक्ष कामगार आघाडी नेते मनीष रामील्ला, युवा मोर्चा शाखा अध्यक्ष दीपक ढोंगे, महामंत्री गजानन शिवूरकर, महामंत्री सचिन राऊत, उपाध्यक्ष प्रदीप राऊत, सचिव प्रमोद राऊत यांच्या सह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने