चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष ​​धुन्नू महाराज यांचे निधन.

Bhairav Diwase


धुन्नू महाराज यांच्या निधनाने चंद्रपुरच्या मातीशी समरस झालेला नेता आम्ही गमावला:- आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुरचे माज़ी नगराध्यक्ष , ज्येष्ठ नेते गयाचरणजी त्रिवेदी यांच्या निधनाने चंद्रपुरच्या मातीशी समरस झालेला नेता आम्ही गमावल्याची शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रपुरचे नगराध्यक्ष म्हणून धुन्नू महाराज यांनी शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. विकासप्रक्रियेत त्यांनी कधीही राजकारण केले नाही. त्यांच्या निधनाने चंद्रपुरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे असेही आ. मुनगंटीवार यांनी शोकसन्देशात म्हटले आहे.
शिस्तप्रिय, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व कायमचे हरपले:- आ. किशोर जोरगेवार.

धन्नू महाराज यांनी नगराध्यक्ष असतांना आपल्या शिस्तीने प्रशासनावर अंकुश ठेवत चंद्रपूरात अनेक असाधारण गोष्टी सहज शक्य करून दाखविल्यात त्यांच्याच कार्यकाळात चंद्रपुरची प्रमुख ओळख असलेली सात मंजली इमारत उभी राहिली. आज त्यांच्या जाण्याने चंद्रपूरकरांनी एक शिस्तप्रिय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व कायमच गमावलं असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी धन्नू महाराज त्रिवेदी यांच्या निधनानंतर दिलेल्या शोकसंदेशात मटले आहे.
  धन्नू महाराज हे यशस्वी राजकारण्यासह उत्तम व्यवसायिकही होते. त्यांचे अनेक राजकीय पक्षातील लोकांशी चांगले संबध होते. आमदार झाल्यानंतर चंद्रपूरच्या विकासासाठी त्यांनी मला अनेकदा अनेक सूचना केल्यात त्यातून चंद्रपूरच्या विकासासाठी त्यांची असलेली तळमळ जणवायची. मी नुकतीच त्यांची भेट घेतली होती. ते नगराध्यक्ष असतांना मनपा प्रशासनावर त्यांची उत्तम पकड होती. त्यांच्या कार्यकाळात झालेली कामे दर्जेदार असायची. आज त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे आ. जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
धुन्नू महाराज यांच्या निधनाने चंद्रपूरच्या राजकीय क्षेत्रातील कर्मठ, कर्तव्यदक्ष नेता हरपला:- खासदार बाळू धानोरकर

नगराध्यक्षपदाच्या काळात धुन्नू महाराज यांनी चंद्रपुरात भव्य वास्तू उभ्या केल्या. प्रशासनावर त्यांची पकड होती. त्यांच्या निधनाने धुन्नू महाराज यांच्या निधनाने चंद्रपूरच्या राजकीय क्षेत्रातील कर्मठ, कर्तव्यदक्ष नेता हरपला. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना खासदार बाळू धानोरकर यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे. 
    या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!
धुन्नू महाराज यांच्या निधनाने चंद्रपुर येथील हजरजबाबी नेतृत्व हरपलं:- माजी आमदार सुदर्शन निमकर

चंद्रपुरचे माज़ी नगराध्यक्ष , प्रतिष्ठित व्यवसायिक, ज्येष्ठ नेते गयाचरणजी त्रिवेदी उर्फ धुन्नु महाराज यांच्या निधनाने चंद्रपुरच्या विकासातील महामेरु गमावल्याची भावना सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. धुन्नू महाराजांशी आमचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते. महाराज गेल्या अनेक वर्षांपासून आमच्याकडे दरवर्षी न चुकता हुरडा खाण्या करीता येत होते. या निमित्ताने आमच्या कुटुंबाशी जवळीक होती.एक धडाडीचा नेता आम्ही गमावल्याची शोकभावना माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रपुरचे नगराध्यक्ष म्हणून धुन्नू महाराज यांनी शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. धुन्नू महाराज यांनी आपल्या विचाराशी तडजोड केली नाही. यांच्या निधनाने चंद्रपुरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, असे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सामाजिक व आध्यात्मावर प्रचंड आस्था असणारे मनमिळावू, स्पष्टवक्ता, मार्गदर्शक नेता गमावला:- माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

चंद्रपूर:- स्व. धुन्नु महाराज (पं. गयाचरण त्रिवेदी) पूर्व नगराध्यक्ष यांचे दुःखद निधन फार वेदना देणारे असे आहे. त्यांचे नगराध्यक्ष कार्यकाळात मी नगरसेवक असतांना त्यांचेसोबत कार्य केले. त्यांचे विकासकार्य, कार्यपध्दती फार जवळुन पाहिली. स्वच्छ प्रशासनासोबत निष्कलंक त्यांचा कार्यकाळ जवळपास 15 वर्ष चंद्रपूर नगरितील जनतेनी अनुभवला. तुटपुंज्या फंडातून विकास कार्य करतांनाची कसरत ते करीत होते. 
  एक सामाजिक व आध्यात्मावर प्रचंड आस्था असणारे मनमिळावू, स्पष्टवक्ता, आम्हाला मार्गदर्शन करणारे नेतृत्व आम्ही गमावलं. फार दुःखद आहे. त्यांना मी श्रध्दांजली अर्पण करतो.