💻

💻

शहरातील बस स्थानक परिसरात युवकाचा अंगावर वीज पडून मृत्यू. #Chandrapur #Lightningstrikes

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर बस स्थानक परिसरातील महसुल भवनाच्या छतावर केबलचे काम करत असलेल्या 22 वर्षीय युवकाचा विज पडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
शहरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी विजेचा कडकडाट सुरू होता. त्याचवेळी मुख्य बस स्थानक समोरील महसूल भवन वरती मुले केबल टाकण्याचे काम करीत होते. अचानक विजेचा कडकडाट झाला आणि केबल टाकणाऱ्या अनिकेत नामक युवकाचा अंगावरती वीज पडली. अंगावर वीज पडल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला.
मृतक युवकाचे पूर्ण नाव अनिकेत चांदेकर (वय 22) असून तो नागभीड येथे राहणारा आहे.अनिकेत सद्या चंद्रपुरातील बाबूपेठ येथे जुनोना चौक भाड्याने राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून शहरात केबल टाकण्याचे काम करीत होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत