🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

"त्या" बिबट्याची नजर गावातील कोंबड्यांवर! #Leopard

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- किटाळी मेंढा परिसरातील जंगलात वास्तव्यास असलेल्या 'त्या' बिबट्यास कोंबड्याच्या खुराकीची सवय लागली आहे. ही सवय पूर्ण करण्यासाठी तो दोन-चार दिवसाआड गावात येतो आणि कोंबड्या घेऊन जातो.
किटाळी मेंढा हे गाव जंगलव्याप्त आहे. गावाच्या आजूबाजूला चांगलेच जंगल आहे. या गावातील नागरिकांंचा शेती तसेच घरगुती कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. प्रत्येकाच्या घरी कोंबड्या पाळल्या जातात. किटाळी मेंढा गावाच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात अनेक जंगली पशू वास्तव्यास आहेत. यात वाघ आणि बिबट्यांचाही समावेश आहे. यातीलच एका बिबट्याची नजर गावातील कोंबड्यांवर गेली आहे. दोन-चार दिवासाआड रात्रीच्या वेळेस गावात येऊन तो एक कोंबडा किंवा कोंबडी खुराकीसाठी घेऊन जाऊ लागला आहे.
गेल्या एक महिन्यापासून त्याचा हा क्रम सुरू आहे. या गावातील अनेक घरी अंगणात झाडे असल्यामुळे रात्रीच्या वेळेस कोंबड्या झाडावरच राहतात. या झाडांवर असलेल्या कोंबड्या हा बिबट घेऊन जात आहे. किटाळी मेंढा गावचे सरपंच हितेश कुंभरे यांच्या घरच्याच या बिबट्याने अशाच सहा-सात कोंबडे व कोंबड्या फस्त केल्या आहेत. गावातील अन्य व्यक्तींच्याही कोंबड्या या बिबट्याने फस्त केल्याची माहिती आहे.
बिबट्याची ही सवय लोकांना माहीत झाल्यानंतर त्यांनी कोंबड्यांना गुरांच्या गोठ्यात बेंडून ठेवणे सुरू केले. काही दिवस हा प्रकार थांबला. मात्र दोन दिवसांपूर्वी पुरुषोत्तम मांढरे यांच्या गोठ्यात बेंडून असलेला कोंबडा बिबट्याने उचलून नेऊन फस्त केला. बिबट्याकडून सुरू असलेल्या या प्रकाराने गावकरी चांगलेच त्रस्त झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत