🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या चार आरोपींना अटक. #Arrested

अल्पवयीन मुलींची पुणे येथून सुटका.

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यश.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- स्थानिक गुन्हे शाखेने वरोरा तालुक्यातील तिन अल्पवयीन मुलींची पुणे येथून सुटका करून चार आरोपींना ताब्यात घेण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.
सविस्तर वृत्त वरोरा हद्दीतील दोन अन्पवयीन मुली त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याच्या कारणावरून मुली घराबाहेर पडल्या होत्या परंतु मुली सायंकाळ पर्यंत घरी परत न आल्याने मुलींच्या आई वडीलांनी व ईतर नातेवाईकानी मुलींची घराच्या आजूबाजूस व गावात शोधाशोध सुरू केली परंतू मुली परत न आल्यामुळे नातेवाईकांनी पोलिस स्टेशन वरोरा येथे जाऊन मुलींना कोणीतरी अज्ञात इसमांनी फुस लावून पळवून नेल्या बाबतची तक्रार दिल्याने पो.स्टे. वरोरा येथे अज्ञात आरोपींवर मुलींना फुस लावून पळवून नेल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील दोन्ही मुलींचे वय १५ वर्षांचे आतील असल्याने मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तात्काळ सदर गुन्हयाचा छडा लावण्या करीता सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ स.पो.नि. जितेंद्र बोबडे, पो. उपनि. संदीप कापडे, संचिन गदादे अतूल कावळे यांचे नेतृत्वात चार पथक तयार करण्यात आली. पथकाने घटनास्थळावर जावून गुन्हयाची सखोल माहिती गोळा करून त्यावरून असे निष्पन्न झाले की, यवतमाळ जिल्हयातील राळेगांव येथील काही मुले या अल्पवयीन मुलींच्या संपर्कात होते.

त्यावरून स्थानिक गुन्हा शाखा चंद्रपूर चे तिन पथके तात्काळ राळेगांव येथे तपासाकारिता रवाना झाले. त्या ठिकाणी गुप्त बातमीदारांकडून माहिती घेत असतांना पो.स्टे. बाबुळगांव जि.यवतमाळ हद्दीतील एका मुलगी अज्ञात इसमान्दारे अपहरण केल्या बाबत समजले व पो.स्टे. वरोरा हद्दीतील व पो.स्टे. बाबुळगांव जि. यवतमाळ हद्दीतील मुलींचे एकाच टोळीने अपहरण केल्याचे निष्पन्न झाले.
पथकातील अधिकाऱ्यांनी गुप्त बातमिदारांव्दारे माहिती घेतली असता वर्धा रेल्वे स्टेशन येथे दिसून आल्या बाबत माहिती प्राप्त झाली. त्या बाबत अधिक माहिती घेतली असता वरील नमुद गुन्हयातील पिडीत मुली व त्यांना घेवून जाणारे मुले हे रांजनगांव जि.पुणे येथे असल्याचे माहिती प्राप्त झाली. त्यावरून तात्काळ मा. पोलीस अधीक्षक सा व पो.नि. सा. स्था.गु.शा. चंद्रपूर यांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली पुणे करीता पथक रवाना झाले. तात्काळ पुणे पोलीसांना सुद्धा वरीष्ठ अधिकारी यांचे मार्फतीने माहिती देवून त्यांचे मदतीने सापळा रचून शिताफीने कार्यवाही केली असता नमुद गुन्हयातील तिन अपहरण झालेल्या अल्पवयीन मुली व त्यांचे सोबत ४ संशयीत मुले नामे १) रोहीत गोपाल संगीले वय २० वर्षे २) शुभम संजय मानेकर वय २२ वर्षे ३) प्रमोद मोतीबाबा सोनवने वय २२ वर्षे ४) प्रक्षिक विलास भोयर वय २३ वर्षे सर्व रा. राळेगांव जि.यवतमाळ हे मिळून आल्याने सर्वांना ताब्यात घेवून चंद्रपूर येथे आणण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची यशस्वी कामगीरी मा. श्री. अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो. नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे स.पो. नि. जितेंद्र बोबडे, पो. उपनि, संदीप कापडे, सचिन गदादे अतूल कावळे, पो.स्टॉफ पो.हवा. धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, ना.पो. शि. गजानन नागरे, पो. शि. प्रशांत नागोसे, संदीप मुळे, चा.ना.पो. शि. दिनेश अराडे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत