🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू. #Lightning strikes

पोंभुर्णा तालुक्यातील घटना.
पोंभूर्णा :- विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडून एक शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याची घटना आज दि. १ आक्टोंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास पोंभूर्णा तालुक्यातील चेक कोसंबी नं. २ येथे घडली असून निर्मला साईनाथ तलांडे वय ४५ वर्ष असे मृतक शेतकरी महिलेचे नाव आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी आज दुपारी वीजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. मृतक महिला आपल्या दोन मुलांसह घरच्या शेतात निंदण काढण्याचा काम करत होती. दुपारी २ वाजताच्या सुमारास काम करत असताना अचानक विजेच्या कडकडाटासह वादळासह पाऊस सुरू झाला. व यातच निर्मला तलांडे हिच्यावर विज कोसळली. यात ती जागीच ठार झाली. मुलं दुर असल्याने ते वाचले.
मृतक शेतकरी महिलेच्या पश्चात पती, दोन मुलं, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत