Top News

इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचे आंदोलन. #Chandrapur


पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात युवासेना शहरच्या वतीने सायकल रॅली.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- युवासेना प्रमुख, पर्यावरण, पर्यटक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रव्यापी सायकल रॅलीचे आयोजन संपुर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले होते. या अनुषंगाने युवासेना कार्यकारीणी सदस्य रूपेश कदम, शितलताई देऊरूखकर, युवासेना जिल्हा विस्तारक त्रिपाठी, युवती विस्तारक तृष्ना गुजर यांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, महानगर प्रमुख प्रमोद पाटील मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वात युवासेना शहरच्या वतीने महानगर चंद्रपुर येथे भव्य सायकल रॅली काढण्यात आली.
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. वारंवार इंधन दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ युवा सेनेच्या वतीने बैलगाडी सोबत शेकडोच्या वर सायकल रॅली काढून विविध केंद्र सरकार विरोधी घोषणा देऊन केंद्र सरकारने जनतेला २०१४ मध्ये सरकार स्थापन करताना "अब हो गई महगांई की मार अब कि बार मोदी सरकार" या घोषवाक्याची आठवण करून केंद्र सरकारनी त्यावेळी इंधन वाढीवर अंकुश आनण्याच्या दिलेल्या आश्वासन रूपी लाॅलिपाॅपचे नागरिकांना वाटप करून आठवण करून देण्यात आली. यावेळी या भव्यदिव्य सायकल रॅलीमध्ये शेकडो च्या वर सायकली सोबत युवा-युवती सहभागी झाले.
यावेळी शिवसेनेचे स्वप्निल काशीकर, वसीम भाई, सुरज घोंगे, युवासेनेचे जिल्हा चिटणीस विनय धोबे, उपजिल्हा अधिकारी सुमित अग्रवाल, तेलतुमडे, शहर अधिकारी, अक्षय अंबिरवार, प्रमोद नन्नावरे, शहर समन्वयक करन वैरागडे, शहर चिटणीस नगाजी गनफाडे, युवती सेना उपजिल्हा अधिकारी रोहीनी पाटील, विपषना मेश्राम, तालुका अधिकारी प्रगती पडगेलवार, युवासेनेचे सुचीत पिंपळशेंडे, उपशहर अधिकारी समीर मेश्राम, वैभव काळे, प्रफुल चावरे, तालुका सन्मवयक नागेश कडुकर, अमोल मेश्राम, अमोल मंगाम , हसंराज खरोले, प्रविण ऊके, चेतन कामतवार, किशोर सिडाम, सतोंष सिगम, मुकेश जक्कुलवार, सुजित पेंदोर, महिला सेनेच्या कुसुमताई उदार, विद्या ठाकरे, निशा धोंगडे, युवती सेनेच्या आरती समृद्दलवार, काजल बुटले, धनश्री हेडाऊ, विक्रांत समृद्दलवार, राहुल पडघाणे, प्रशांत माट्टूरवार, प्रियंन बोरकुटे, संकेत लोखंडे, ओंकार बावणे, शंतशु हेडाऊ, कुणाल आगडे, देविदास देशकर, निश्चय जुमडे, प्रतीक गायकवाड, श्रेयस वैरागडे, गीतेश बेले, सिद्धेश बेले, लक्षित खानके, पियुष वैरागडे, सॅम कुरेशी, ऋषभ चाहरे व समस्त युवासैनिक युवतीसैनिकांची उपस्थिती होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने