Top News

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ:- जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे.


शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन.
पोंभुर्णा:- शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि गरज पडल्यास 20 टक्के राजकारण करत असते. पोंभुर्णा तालुक्यात सुरु करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयात सुध्दा जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी केले. पोंभुर्णा शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवसेनेच्या वतीने जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात येत आहे. नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी हे कार्यालय उघडण्यात आले आहे. नागरीकांनी आपल्या समस्या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात आणाव्यात आम्ही त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करु असे तालुका प्रमुख आशिष कावटवार यांनी सांगितले.

  शिवसेनेची जनतेशी नाळ जुळलेली आहे. म्हणूनच तालुक्यात सहा ग्रामपंचायतीवर शिवसेनेची एकहात्ती सत्ता दिली. ग्रामीण भागात शिवसेना पक्षात होत असलेला प्रचार व प्रसार रोज रोज वेगवगळ्या पक्षातून कार्यकर्त्यांचा प्रवेश त्यामूळे होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका शिवसेना संपुर्ण ताकतीने लढवू मागिल  पोंभुर्णा नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेला मिळालेला अपयश यावेळी यशाची शिखर गाठेल. मी स्वता ताकतीने तुमच्या मागे उभा राहुन होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना समोर जाऊ व विजय संपादन करुया असे आपल्या मनोगतात जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी व्यक्त केले.
   
 शिवसेना जनसंपर्क कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाला तालुका प्रमुख आशिष कावटवार, महिला तालुका आघाडी प्रमुख तथा सरपंच आष्टा  किरण डाखरे, तालुका समन्वयक विजय वासेकर, शहर प्रमुख गणेश वासलवार, रविंद्र ठेंगणे, युवासेना तालुका प्रमुख अभिषेक बद्दलवार, शहर प्रमुख महेश श्रिगिरिवार, कांता मेश्राम, जामतुकुमचे सरपंच भालचंद्र बोधलकर, थेरगावचे सरपंच संगीता गणविर, उपसरपंच वेदनाथ तोरे, वेळवाचे सरपंच सिमा निमसकार, उपसरपंच जितू मानकर, घनोटीचे सरपंच यशोदा ठाकरे, चेक हत्तीबोडीचे सरपंच संगीता कुडमेथे, दिघोरीचे सरपंच वनीता वाकूडकर, उपसरपंच शंकर वाकूडकर, किशोर डाखरे, गंगाधर गदेकार, गणेश दिवसे, पवन गेडाम, लोकाजी दामपेल्लीवार, विलास बुरांडे, विकास शेडमाके, अक्षय व्याडकर, सुधिर वडपल्लीवार, अशोक बोलीवार, समीर गौरकर, संदीप सुमटकार तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने