Top News

ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले गणपती ई-स्कुटर #Rajura

पेट्रोल दरवाढीमुळे वैतागलेल्या नागरिकांना दिलासा.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- पेट्रोलच्या चढत्या किंमती आणि प्रदूषणात होणारी वाढ ह्यामुळे वैतागलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा ह्यासाठी सरकारने पारंपरिक इंधनाचा पर्याय म्हणुन विद्युतचलीत वाहनांचा पर्याय जनतेने स्वीकारावा ह्यासाठी प्रयत्न सुरू केले असुन जनतेची आर्थिक बचत व्हावी व प्रदूषण कमी करण्यात हातभार लावावा त्याचप्रमाणे शासनाच्या धोरणाला मदत व्हावी ह्या उद्देशाने राजुरा शहरात गणपती सर्व्हिसेसने ई-स्कूटर विक्रीच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. 

वैभव धोटे व रुपेश वाटेकर ह्या तरुणांनी नव्या युगातील नवे तंत्रज्ञान शहरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोलकाता येथिल स्टेला कंपनीच्या बॅटरीवर चालणार्‍या दुचाकी विक्री सुरू केली असुन दिनांक 28/10/2021 रोजी श्रीमती रजनी धोटे ह्यांच्या शुभ हस्ते गणपती सर्व्हिसेसचा थाटात शुभारंभ करण्यात आला. आकर्षक डिझाईन व मनमोहक रंगसंगतीने सजलेल्या ह्या ई-स्कूटर कडे तरुणाईच नव्हे तर जेष्ठ नागरीक सुद्धा आकर्षित होत असुन लवकरच ह्या दुचाकी शहरातील सर्वांच्या पसंतीस उतरतील असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला आहे.
यावेळी माजी आमदार अॅड संजय धोटे, राजूरा शहराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष विलास बोनगिरवार, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, सिद्धार्थ पथाडे, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था चे मिलिंद देशकर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश भाऊ धोटे व विनायक देशमुख, अँड अरुण धोटे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप जैन, नगरसेवक राधेश्याम अडानिया, अमजद खान, गणेश रेकलवार, रिजवान बंदाली, इरफान बंदाली, सेवा निवृत्त वनअधिकारी अशोक मेडपल्लीवार व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.#rajura

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने