जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏

✌️

वरोरा काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधान स्व. इंदीरा गांधी यांना आदरांजली. #Warora


स्व. इंदिरा गांधी यांच नेतृत्वं, कर्तृत्व, बलिदान प्रेरणादायी:- आमदार धानोरकर.
वरोरा:- ‘गरीबी हटाओ’चा नारा देत सर्व घटकांच्या प्रगतीसाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करून देशाच्या जडनघडनीत व प्रगतीपथावर नेण्यात माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांचा मोठा वाटा आहे, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.इंदिरा गांधी यांच नेतृत्वं, कर्तृत्व, त्याग आणि त्यांचं बलिदान देशवासियांना कायम प्रेरणा देत राहील,असे गौरवोद्गार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.

वरोरा काँग्रेसतर्फे स्व. इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित
आदरांजली कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आपल्या कणखर नेतृत्वाने जागतिक राजकारणात भारताला सक्षम बनवणाऱ्या इंदिराजींनी बांग्लादेशची निर्मिती करून जगाचा भूगोल बदलविला. स्व. इंदिराजी खरच आयर्न लेडी होत्या असेही आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या.
माजी नगराध्यक्ष विलास टिपले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजु चिकटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, प्रशांत काळे, नगरपालिकेचे गटनेते गजानन मेश्राम,सभापती राजेंद्र धोपटे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. प्रमोद मगरे, बसंत सिंग, युवक काँग्रेसचे शुभम चीमुरकर,मनोहर स्वामी,सलीम पटेल, सुभाष दांदले,प्रतिमा जोगी,सुरज गावंडे,राजू मिश्रा, सनी गुप्ता, प्रमोद काळे,राहुल ठेंगणे,गौरव स्वामी, राजेंद्र डफ,प्रफुल्ल आसुटकर,मयुर विरूटकर आदी पदाधिकार्यांनीही पुष्पांजली अर्पण केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत