💻

💻

मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. #Death

कोल्हापूर:- कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील खोची गावात मधमाशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात शेतकरी जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. वाय.डी.ऊर्फ यशवंत दत्तू बाबर (वय ५८) असे मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
ते दुधगावगोंड भागातील आपल्या उसाच्या शेतात गेले असता ऊसातच त्याच्यावर मधमाशांनी हल्ला केला.मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्याने ते वेदनेने व्याकूळ झाले होते.
उपचारासाठी त्यांना सीपीआर येथे दाखल करण्यासाठी नेले असता ते मयत झाल्याचे घोषित केले. मधमाशांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत