(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:-राजुरा येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवा स्वास्थ्य अभियान अंतर्गत कोरोना लसीकरण शिबीर व लसीकरण जागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा. अविनाश जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम. वारकड, उपप्राचार्य डॉ आर. आर. खेरानी, कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, डॉ सारिका साबळे, क्रीडा व शारिरीक शिक्षण संचालक डॉ आनंद रायपुरे, प्रा. विठ्ठल आत्राम, प्रा. सुवर्णा नलगे, प्रा. मलिक काझी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण शिबिर पार पडले, या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील लसीकरण करणाऱ्या चमूमध्ये अजय मडावी, प्रवीण पगडे, सिस्टर माधुरी ठाकरे, शिल्पा शेंडे, सागर येमुर्ले यांनी लसीकरणाचे कार्य पार पाडली. यावेळी 55 विद्यार्थ्यांचे लसीकरण पार पडले, या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.#Program