Top News

रामपूर-गोवरी-पोवणी रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम तात्काळ सुरू करा:- सभापती सुनील उरकुडे.


येत्या 10 तारखेच्या आत काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा ताकीद.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
राजुरा:- गेल्या दोन तीन वर्षांपासून रखडलेले राजुरा गोवरी पोवणी काढोली रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी सभापती सुनील उरकुडे यांचेकडून होत असली तरी आणि सदर संदर्भात गोवरी पोवणी वासीयांनी वारंवार आंदोलन करून सुद्धा काम सुरू केल्या गेलेले नाही पाऊस संपेपर्यंत थांबून जाऊ असे अधिकाऱ्यांनी सांगितले प्रमाणे थांबून सुद्धा आता पावसानंतर काम सुरू न झाल्याने सभापती उरकुडे यांनी pwd कार्यालयात जाऊन उपविभागीय अभियंता बाजारे यांच्याशी चर्चा केली आणि तोंडावर आलेला दिवाळी सण लक्षात घेता अतिरिक्त मुदत देत म्हणजे 10 तारखेपर्यंत मजबुतीकर्णाचे काम सुरू न केल्यास बेमुदत रस्ता रोको आंदोलन भाजपा तर्फे करण्यात येईल अशी चेतावणी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने