जाहिरात... Advertisement... विज्ञापन

विविध स्तरांतून उराडे सरावर कौतुकाचा वर्षाव....... #Gondpipari


गोंडपिपरी:- सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात गौतम दाऊजी उराडे विषय शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात विद्यार्थी हेच दैवत मानून अखंड त्यांच्या उत्कर्षाचा ध्यास घेतला. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव अशी कामगिरी केली.

गोंडपीपरी तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांनी आपल्या कारकिर्दीत समाजातील सर्वच लोकांचे मने जिंकलेली आहेत. त्याचाच परिपाक म्हणून उराडे सरांवर सतत दोन महिन्यांपासून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
   

      दि. 5 सप्टेंबर 21 ला जि. प. चंद्रपूरने त्यांना मानाचा शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर ग्रामपंचायत विठ्ठलवाडा यांनी विशेष समारंभात त्यांना अंकुर सावकार मल्लेलवार सरपंच ग्राम पंचायत विठ्ठलवाडा यांच्या हस्ते सन्मानित केले. समूह साधन केंद्र विठ्ठलवाडा च्या वतीने त्यांना विशेष कार्यक्रमात धनराज अव्वारी गटशिक्षणाधिकारी पं स. गोंडपिपरी, नामदेवराव राऊत शिक्षण विस्तार अधिकारी, मुत्यालवार केंद्रप्रमुख विठ्ठलवाडा, टी. आर. महल्ले केंद्रप्रमुख चिमूर यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून म्हणून जि. प. चंद्रपूर च्या  वतीने गौरविण्यात आले.

     अखिल प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गोंडपीपरी च्या वतीने त्यांना सपत्नीक गौरविण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रेम खोब्रागडे, जिल्हा सल्लागार अभय कोसूनगोत्तावर व सचिन बावणे यांनी त्यांच्या विधायक कार्याचा लेखाजोखा मांडला व पुढील संघटन वाढीसाठी व समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
    समस्त गावकरी बंधू भगिनी विठ्ठलवाडा यांच्यावतीने मेश्राम साहेब तहसीलदार चिमूर, सौ. शारदाताई पिंपळकर पोलिस पाटील विठ्ठलवाडा, विठ्ठल रुख्मिनी देवस्थानचे तरुण तडफदार कार्यकर्ते संजय वागदरकर, युवराज पिंपळकर, अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा विठ्ठलवाडा दर्शनाताई दुर्गे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष रेखाताई रामटेके यांनी उस्फूर्तपणे गावकऱ्यांच्या वतीने जंगी सत्कार सोहळा घडवून आणला.
  
     सरांचे मुळगाव तारसा बू. च्या समाजबांधवांनी मेश्राम साहेब तहसीलदार गोंडपिपरी, निमसरकार सर, मोरेश्वरजी दुर्गे, नितेश डोंगरे पत्रकार, राजू झाडे पत्रकार, गाव माझा न्यूज चॅनेल चे पत्रकार राजकपूर भडके इ. मान्यवरांनी गावच्या सुपुत्राचा यथोचित मानसन्मान करून गौरव केला. भविष्यात गावच्या उन्नतीसाठी सदैव कार्यरत राहीन असे अभिवचन याप्रसंगी गौतम सरांनी दिले
                    
         निस्वार्थपणे केलेल्या कार्याची दखल शासन स्तरावर व ग्रामीण स्तरावर समाजमाध्यमे घेत आहेत. हीच खरी यशाची पावती होय. या यशापर्यंत पोहोचविण्यात माझे प्रेरणास्थान, वेळोवेळी प्रेरणा देणारे, दिशादर्शक, दर्शक आदरणीय महल्ले साहेब केंद्रप्रमुख विठ्ठलवाडा यांची मोलाची भूमिका आहे, असे उराडे सर सांगतात. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तारसा खुर्द च्या वतीने सुद्धा सरांना गौरविण्यात आले. आज गौतम उराडे जि. प. उच्च प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा शाळेचे सर्वेसर्वा असून शाळेची आण, बाण व शान आहेत. त्यांच्या कार्याचा वेल असाच गगणावरी चढू दे ही मनोकामना.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत