बेंगळुरू:- साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं निधन झालं आहे. आज सकाळी पुनीत यांना बेंगळुरू येथील विक्रम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना आज सकाळी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
हॉस्पिटलमध्ये दाखल करतानाच पुनीत राजकुमार यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत देखरेख ठेवून होती. पुनीत 46 वर्षांचे होते. काही वेळापूर्वी विक्रम हॉस्पिटल प्रशासनाकडून अधिकृत निवदेन समोर आलं होतं.
अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या सकाळी 11.30 वाजता छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. आता काही सांगू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये आणतानाच त्यांची प्रकृती खराब होती, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती विक्रम हॉस्पिटलचे डॉ रंगनाथ नायक यांनी दिली होती.
29 ऑक्टोबर रोजी पुनीत राजकुमार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तातडीने बेंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात होतं. अभिनेत्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) डॉक्टर उपचार सुरु होते. त्यांच्या चाहत्यांनी ट्विटरवर ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई यांनी पुनीत राजकुमार यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विक्रम हॉस्पिटल गाठलं.