मनसे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा. #MNS

Bhairav Diwase

सर्वत्र मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह.
चंद्रपूर:- मनसेचे जिल्हासचिव (बल्लारपूर विधानसभा क्षेत्र) किशोर भाऊ मडगुलवार यांचा वाढदिवस मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमातून मोठ्या उत्साहात साजरा केला. चंद्रपूर येथे मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता, प्रविण शेवते यांनी पुढाकार घेत किशोर भाऊंच्या वाढदिवशी कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता दिवसरात्र आपल्याला सेवा देणारे सफाई कामगार यांचा कोरोणा योद्धा म्हणून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सामान्य रूग्णालयात रूग्णांना फळ वाटण्यात आले.
सचिन बाळस्कर तालूका उपाध्यक्ष चंद्रपूर, अनरोज रायपूरे, पुरूषोत्तम मेश्राम, प्रकाश आत्राम, धिरज साखरे यांच्या पुढाकाराने मनसे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता यांच्या उपस्थितीत दुर्गापूर येथील रूग्णालयात कोरोणा महामारी पासून सुरक्षित रहावे. या निस्वार्थ हेतूने रुग्णांना व कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर व फळ वाटप करण्यात आले.
नंतर डेबु सावली वृद्धाश्रमात किशोर भाऊंच्या हस्ते वृद्धांना शाल व फळे देण्यात आले. यावेळी वृद्धांनी किशोर भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आर्शिवाद दिले.
राजूरा येथे मनविसे तालूका अध्यक्ष गनेश पुसाम व सूरज भांबरे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर पोंभूर्णा तालूका मनसे पदाधिकाऱ्यांनी किशोर भाऊ प्रती असलेली सहानुभुती दाखवत मनसे पोंभूर्णा तालूकाध्यक्ष आकाश तिरूपतीवार व मनविसे पोंभूर्णा तालूकाध्यक्ष आशिष नैताम यांच्या संकल्पनेतून पोंभूर्णा येथील गरीब व गरजू कुटुबांना जीवनावश्यक अन्नधान्य वितरीत करण्यात आले.
तसेच ग्रामीण रूग्णालय पोंभूर्णा येथे रूग्णांना फळ वाटून राजराजेश्वर मंदिर पोंभूर्णा येथे किशोर भाऊंच्या दिर्घाआयूष्यासाठी पुजा करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या सामाजीक उपक्रमानंतर सांयकाळी किशोर भाऊ मडगुलवार यांच्या निवासस्थानी चंद्रपूर येथे केक कापून मनसे पदाधिकारी, कार्यकते, मनसैनिक व आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.