जाहिरात... Advertisement... विज्ञापन

विरुर वनविभागाची थोमापूर येथे धाड. #ForestDepartment

7 हजाराचे अवैध सागवान जप्त; एक आरोपी ताब्यात.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार विरुर वन परीक्षेत्र अधिकारी आणि अधिनस्त वनकर्मचारी यांनी थोमापूर येथील एका घरी धाड टाकून सुमारे 7 हजार रुपये किमतीचे अवैध सागवान लाकडे जप्त करण्याची कारवाई आज 11 ऑक्टोबर रोजी विरुर वनकर्मचार्यानी केली. या कारवाईत एकास ताब्यात घेतले असून दोघे आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.
विरुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्या थोमापूर येथील मोहन गुगलोत याचे घरी अवैधरित्या सागवान लाकडाची साठवणूक असल्याचे गोपनीय माहिती वरून विरुर वनपरिक्षेत्राचे अधिकारी गजानन इंगडे, क्षेत्रसाहायक एस एम मांदाडे, एस बी काटकर, व इतर वनरक्षक, वनमजुर यांनी सापड रचून धाड टाकली या झडती दरम्यान अवैधरित्या सागवान लाकडापासून घरगुती उपयोगाचे साहित्य करीत असल्याचे आढळून आले.
सदर मालाचे मोजमाप केले असता सुमारे 7 हजार रुपयांचा मुद्देमाल सह घरमालकास वनकर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांचे मार्गदर्शनात सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगडे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत