बंदच्या पार्श्वभूमीवर भद्रावतीत केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने. #Bhadrawati

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर भद्रावती येथील महाराष्ट्र विकास आघाडी समन्वय समितीतर्फे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात स्थानिक बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ आज दिनांक ११ रोजी सोमवारला निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लखीमपुर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यात आला. या घटनेला केंद्र शासनाला दोषी धरून केंद्र शासन या विरोधात निदर्शनं करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून गांधी चौकापर्यंत एक रॅली काढून दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून भद्रावती बंदला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ज्ञानेश्वर डुकरे, मुनाज शेख, सुधाकर रोहणकर, रमेश मेश्राम, प्रशांत काळे, सुरज गावंडे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडी समन्वय समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.