प्रत्येक स्त्री दुर्गा आहे आणि भाजपा महिला आघाडी प्रत्येक स्त्रीला सन्मानाने जगण्यासाठी मदत करते:- भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम. #Pombhurna #Gondpipari

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- स्त्रीला सन्मान नारी शक्तीचा नवरात्र महोत्सवी नवदुर्गा पूजन करून महिला सशक्तिकारण करण्याच्या उद्देशाने भाजपा महिला आघाडी कडून पोंभुर्णा येथे दर्शन दुर्गा मंडळ येथे 9 मुलींचे शैक्षणिक साहित्य देऊन पूजन करण्यात आले.
तसेच गोंडपिपरी येथे गरजु महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू तसेच रोख रक्कम देऊन नवदुर्गा खरंच सक्षम वाव्ही यासाठी महिला आघाडीने पुढाकार घेतला.
यावेळी कु. अल्का आत्राम भाजपा जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, स्वाती देवाळकर युवती जिल्हा अध्यक्ष, वैष्णवी बोडलावर जि. प. सदस्य, सुनीता मॅकलवार, रजिया कुरेशी, नेहा बघेल, अस्मिता रापलवार, अरुणा जांभुळकर, अनुजा बोनगीरवार, प्रांजली बोनगीरवार, कोमल फरकडे, बबनभाऊ निकोडे, दीपक बोनगीरवार, सुहास माडूरवार, चेतन गौर, संजय झाडे, निलेश संगमवार, साईनाथ मास्टे, गणेश डहाळे, वैभव बोनगीरवार, प्रज्ज्वल बोबाटे उपस्थित होते.