Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

दिपावली निमित्त रक्तदान शिबिर संपन्न. #Pombhurna

चेक बल्लारपूर येथील ग्रामपरीवर्तन बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार.
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर येथील ग्रामपरीवर्तन बहुउद्देशीय संस्थेनी अनेक उपक्रम राबविले आहे.‌ आज दि. २८ ऑक्टोबरला दिपावलीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक बल्लारपूर येथे करण्यात आले. या रक्तदान शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रामपरीवर्तन बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांच्या हस्ते पार पडला. या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला प्राथमिक आरोग्य केंद्र, पोंभुर्णा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, चेक बल्लारपूर, शत केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर टिमनी मदत केली. चेक बल्लारपूर येथील ग्रामपरीवर्तन बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी व गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत