Top News

भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार. #Death #accident

दुसरा भाऊ गंभीर जखमी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील सुमठाणा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असुन अपघातात मृतकाचा भाऊ जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार सुमठाणा फाट्याजवळ ट्रक ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एक दुचाकीस्वार ट्रकच्या समोर असलेल्या बसला धडकल्याने त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला असुन दुचाकीवर सोबत असलेला त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. वृत्त लिहेपर्यंत "त्या" दोघांचे नाव कळू शकले नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने