जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पोंभूर्णा तालुक्यात ‘मिशन कवच कुंडल’ एक्टीव्ह मोडवर. #Pombhurna


रोज एक हजार लोकांचे लसीकरण.
पोंभूर्णा:- राज्यभरात राबविण्यात येत असलेली मिशन कवच कुंडल ही मोहीम पोंभूर्ण्यात समर्थपणे राबविण्यात येत आहे. पोंभूर्णा तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रातून सहा सेंटरमध्ये एक हजार दोनशे लस प्राप्त होत असून रोज एक हजार पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण पुर्ण करण्यात येत आहे.
मिशन कवच कुंडल ही मोहीम ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत तालुक्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्रातून दररोज एक हजार पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तालुक्यातील १८ते ४५ वयोगटातील पात्र ३४६१४ लाभार्थ्यांपैकी आजमितीस ३० हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी पहिला डोज चे लसीकरण झाले असून आतापर्यंत तालुक्यातील ८६ टक्के नागरिकांनी लसीचे पहिले डोज घेतले आहेत. तर तालुक्यातील दुसरा डोज घेणारे लाभार्थी ९ हजार इतके झाले आहेत. तालुक्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्र असून पोंभूर्णा व नवेगाव मोरे येथील
सहा ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहेत.
पोंभूर्णा तालुक्यात ८६ टक्क्यांच्या वर नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोज घेतला आहे. यापैकी अनेकांनी दुसरा डोज घेतला तर अनेकांचा दुसरा डोज अद्याप बाकी आहे. दुसरा डोज बाकी असलेल्यांनी लवकरात लवकर आपले दोन्ही डोज पूर्ण करून घ्यावे, तर पहिला डोज न घेतलेल्यांनी पहिला डोज घेण्याचे व आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोले यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत