जाहिरात... Advertisement... विज्ञापन

आम्हचा वाघ गेला; इतिहास अभ्यासक निलेश झाडे यांचे बंधू योगेश भगत यांचे निधन. #Death


गोंडपिपरी:- वयाने तो फार लहान होता.पण तो आम्हचा वाघ होता. आम्हचे कुटूंब आंबेडकरी विचारधारे नुसार जगणारे. योगायोग म्हणा की प्राक्तनाचे लिखित म्हणा आम्हाला जावई सूध्दा त्याच विचाराचे मिळाले. आम्हचा वाघ म्हणजे योगेश भगत. आम्हचाशी कुणी भांडण करायला धावून आला, नको ते आरोप कुणी केला तर हा वाघ तुटून पडायचा. शरीराने बळकट असलेला योगेश दहा माणसांना पुरून उरायचा. मागील काही दिवसापासून योगेशचे आरोग्य बिघडले होते. उपचार सूरू होता.आम्हचे जावई अनिल कातकर हे महीणाभरापासून योगेशचा उपचारावर लक्ष ठेवून होते.मात्र आज ( रविवाला ) योगेशचे आरोग्य अचानक बिघडले.त्याला धाबा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोच्चाराठी हलविले.मात्र आरोग्य केंद्र गाठायचा आधीच योगेशने अखेरचा श्वास घेतला.
योगेशचा जाण्याने भगत, झाडे परीवारावर मोठे दुख कोसळले आहे. योगेशचा पश्चात आई विना भगत, वडील भगवान भगत, भाऊ संतोष झाडे, देवराव झाडे, जावई अनिल कातकर, प्रविण मेश्राम, अरूण बोरकर, रूपेश भगत, सपना भगत, ब्रम्हपुत्रा मुंजनकर, कल्पना करमनकर, प्रतिभा मेश्राम, सरवंदा झाडे, काजल झाडे, शुभांगी झाडे, संतोष झाडे, निलेश झाडे, देवराव झाडे, आशिष मुंजनकर, अक्षय करमणकर, सांची, पुर्वा, परी, यशश्री, रीध्दी, यज्ञेश, शिवम, निल, साई, डिगू, असा मोठा आप्त परिवार आहे. धाबा येथे योगेश भगत यांचा पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत