जाहिरात... Advertisement... विज्ञापन

सास्ती, धोपटाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संपला सहा वर्षानंतर वनवास #rajura


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा 
राजुरा:- सास्ती धोपटाळा ug to oc प्रकल्प गेल्या सहा सात वर्षांपासून कॉस्टपल्स मुळे प्रलंबित असल्याने सास्ती, धोपटाला, कोलगाव, मनोली व इतर गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी हवालदिल झालेले होते.
प्रकल्प व्हावा म्हणून रोजनिशी प्रयत्न करीत असताना तब्बल सहा वसर्षानंतर प्रकल्पाचा मार्ग मोकळा होऊन आता चातकासारखी वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना आशेची किरण दिसली. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या पुढाकाराने झालेल्या नागपूर येथील बैठकीत प्रकल्प होण्याचा अडचणी दूर झाल्यात अशी महिती मिळाल्याने समस्त शेतकऱ्यांनी हंसराज भैय्याचे मनःपूर्वक आभार मानले. व क्षेत्रीय मुख्यप्रबंधक कार्यालयात जाऊन सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन निर्णयाचे स्वागत केले.
त्या प्रसंगी जि. प. सभापती सुनील उरकुडे, कोलगाव उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, सदस्य अक्षय निब्रड, युवा नेते किशोरभाऊ कुडे,राजेश दिवसे, राजू निषाद, दिनेश वैरागडे, बालाजी भोंगळे, मधुकर नरड, प्रशांत घरोटे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत