🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आ. सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे व मास्क चे वितरण. #Gondpipari


गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमेटी चा उपक्रम.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गोंडपिपरी:- राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त गोंडपिपरी शहरात व तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यापैकीच एक गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे आजारी रुग्णांना फळे व मास्कचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी प्रामुख्याने कृउबा समिती सभापती सुरेश राव चौधरी माजी सभापती राजीव सिंह चंदेल, माजी उपसभापती प.स. रामचंद्र कुरवटकर , माजी कृऊबा समिती उपसभापती अशोक रेचनकर, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळ सदस्य वेदांत मेहरकुळे, मंगेश खडसे, वासू नगारे सुरेश चीलनकार, छोटू उराडे, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, काँग्रेस अनुसूचित जाती सेल अध्यक्ष गौतम झाडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितिन पेंदाम तसेच ग्रामीण रुग्णालय गोंडपिप्री येथील कर्मचारी वृंद व बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
🟥
याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना आरोग्य बाबत विचारपूस करून फळे व मास्क चे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती गोंडपिपरी चे माजी उपसभापती रामचंद्र कुरवटकर ,कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती अशोक रेचनकर, गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे नियमक मंडळ सदस्य वेदांत मेहरकुळे व काँग्रेस कार्यकर्ता मंगेश खडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप रामगिरकर व ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत