जाहिरात... Advertisement... विज्ञापन

दिघोरी येथील शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू. #Death

संग्रहित छायाचित्र
पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील पोलीस दुरक्षेत्र बेंबाळच्या हद्दीतील मौजा- दिघोरी येथील शेतकरी शालिक शिवराम वाकुडकर (५५) हा शनिवारी सायंकाळच्या सुमारास शेततळ्यात बैल धुण्यासाठी गेला असता, खोल पाण्यात बुडून मु्त्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मु्तक हा शेताजवळील दिगांबर भडके यांच्या शेततळ्यात बैल धुण्यासाठी गेला होता. परंतू बैलांनी झटका दिल्याने तो पाण्यात बुडून मु्त्यू पावला. बैल घरी परतले परंतु मालक घरी न आल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोधाशोध केली असता, शेततळ्यावर मु्तकाच्या चपला आढळून आल्याने पाण्यात मृतदेहाचा शोध घेण्यात आला व पाण्यातून मु्तदेह बाहेर काढण्यात आला.
पोलिसांना माहिती मिळताच बेंबाळ पोलीस दूर क्षेत्राचे परचाके, जुमनाके, तितरमारे व गायकवाड हे घटनास्थळी पोहचले. मर्ग दाखल करुन मु्तदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पुढील तपास बेंबाळ पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत