जाहिरात... Advertisement... विज्ञापन

सोयाबीन कापणीसाठी जाणाऱ्या मजुरांचा टेम्पो उलटला. #Accident


एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू; तालुक्यातील दुसरा घटना.
(संग्रहित छायाचित्र)
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील साखरी येथील मजुरांची गाडी पलटल्यामुळे तीन मजूर जखमी झाले आहे तर एक गंभीर जखमी झालेला होता तो उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. सोयाबीन कापणीचे हंगाम चालू असल्यामुळे रोजीरोटी मिळविण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणात वऱ्हाडात जात असतात.पण रोजीरोटी मिळविण्यासाठी जात असताना आठवडाभरात दोन घटना घडल्या आहेत.
सावली जवळ गाडी पलटल्याने उपरी येथील महिला मृत्यू पावली होती. सदर मजूर यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन कापणीसाठी हरांबा-साखरी येथील गाडी करून काल रात्री आठ वाजता निघाले होते. यवतमाळ जवळ गेले असता अचानक ड्रॉयव्हरच्या डोळ्यावर झपकी आली आणि गाडीचे संतुलन बिघडून गाडी पलटली आणि त्यामध्ये तीन मजूर जखमी झाले होते. किशोर नकटुजी झबाडे वय 28 वर्ष हा युवक गंभीर जखमी झालेला होता. त्या मजुरास गडचिरोली येथील रुग्णलयात भरती करण्यात आले होते. पण तिथे जास्त प्रमाणात प्रकृती बिघडल्यामुळे चंद्रपूर येथे आय सि यु मध्ये भरती करण्यात आले होते मात्र त्याचा आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. एक कष्टकरी होतकरू युवक चा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत