जाहिरात... Advertisement... विज्ञापन

सुमठाणा येथील युवा शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या. #Suicide


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील सुमठाणा येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. दिनांक १३ ऑक्टोबरला घरी कुणी नसल्याचे बघून सुमठाणा येथील गणेश किसन निमकर, वय २७ यांने आपल्या घरी गळफास घेतला.
वडील घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा करून लोकांना बोलाविले, मात्र तोपर्यत या तरुणाचा मृत्यू झाला होता. हा युवक शेती करीत होता. त्याचेवर दोन वषार्पासुन नापिकी असल्याने बँकेचे कर्ज थकीत होते .
यावर्षी कर्ज माफी यादीत नाव नसल्याने तो बेचैन होता. यावर्षी अतिवृष्टी व लाल्या रोगाने पुन्हा पीक वाया गेले होते. आईचा दोन वषार्पूर्वी मृत्यू झाला होता. राजुरा स्टेट बँक येथे आई व वडिलांच्या नावे एक लाख ऐंशी हजाराचे कर्ज होते.
शिवाय या युवकाने शेतीसाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले असल्याची माहिती मिळाली. शेतीतून परतावा येत नसल्याने आता कर्ज कसे फेडायचे. विवंचनेत या तरुणाने अखेर आज आपली जीवनयात्रा संपविली. या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत